लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत शनिवारी ५४२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २ लाख ९५ हजार ८८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४९६ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार २७६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर, उपनगरात ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत एकूण कोविडवाढीचा दर ०.१४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २९ लाख ९८ हजार १८० चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५२९ रुग्ण आणि ६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख १३ हजार ४३१ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४१३ झाला आहे.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या १२२ असून १ हजार ४८८ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ६ हजार २१३ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.
...................