मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस नसून ३९ दिवस; नीरज हातेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 12:39 AM2020-07-19T00:39:19+5:302020-07-19T00:39:29+5:30

महापालिकेचा विश्लेषणात्मक अंदाज चुकीचा

The duration of patients in Mumbai is 39 days instead of 50 days | मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस नसून ३९ दिवस; नीरज हातेकर यांचा दावा

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस नसून ३९ दिवस; नीरज हातेकर यांचा दावा

Next

मुंबई : संपूर्ण मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस इतका असल्याची मुंबई महानगरपालिकेची माहिती चुकीची असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे. सध्यस्थितीत मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी म्हणजेच डबलिंग पिरियड ३९. १७ दिवस असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईचा रूग्ण दुप्पटीचा कालावधी इतक्या महिन्यात कधी ५० पर्यंत पोहोचलाच नसल्याची महितीही त्यांनी दिली.कोरोनाशी लढण्यासाठी त्यासंबंधी प्रशासनाकडून मिळत असलेली माहिती ही अचूक असणे आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. मुंबईची कोरोनाची सध्याची परिस्थिती ही देशाच्या व राज्याच्या इतर विभागांपेक्षा बरीच आटोक्यात असली तरी मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी ५० झाल्याची पालिकेची माहिती चूक असल्याचा दावा हातेकर यांनी केला आहे.मुंबई महानगरपालिकेच्या विश्लेषणात्मक टीमकडून चुकीच्या पद्धतीने विश्लेषण केले जात असल्याने ही चुकीची माहिती त्यांच्या हाती येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे पालकमंत्री आणि इतर बड्या अधिकाऱ्यांकडून या माहितीची खात्री करून घेता ही माहिती समाज माध्यमांमध्ये पसरविली जाणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.९ जून रोजी मुंबईतील रुग्णसंख्येने ५० हजाराचा टप्पा पार केला तर १७ जून रोजी ही संख्या ९९, १६४ होती. त्यामुळे याच्या अभ्यासावरून रुग्ण दुपटीचा मुंबईतील दर वाढत असला तरी तो अद्याप ४० झाला नसल्याचे हातेकर यांनी आपल्या अभ्यासावरून सांगितले. चुकीची माहिती आपल्याला क्षणभराचे समाधान देऊ शकते; मात्र कोविड - १९ शी लढण्याचा उपाय देऊ शकत नाही.

राज्य सरकारने आणि पालिका प्रशासनाने योग्य अचूक विश्लेषणासाठी सांख्यिकी तज्ज्ञ , संशोधक , अभ्यासक, प्राध्यापक यांची मदत घ्यायला हवी आणि मगच विश्लेषणात्मक अचूक माहिती लोकांपर्यंत , पोहचवायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी नेमका किती यावर तांत्रिक वाद असू शकतो. मात्र मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढतो आहे. तर ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
- सुरेश काकाणी (अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका)

Web Title: The duration of patients in Mumbai is 39 days instead of 50 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.