Join us

बंगाल क्लबची दुर्गा दिव्य ज्योती मंदिरात होणार विराजमान; मूर्ती तयार करण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील माती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 8:36 AM

यंदा १९ फुटांची दुर्गा माता दिव्य ज्योती मंदिरात विराजमान होणार आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील माती गेली आहे.

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमध्ये बंगाल क्लबकडून साजरा करण्यात येणारा दुर्गोत्सव मुंबापुरीचे आकर्षण आहे. यंदा १९ फुटी दुर्गा माता दिव्य ज्योती मंदिरात विराजमान होणार आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील माती गेली आहे.

बंगाल क्लब १०१ वर्षे जुना असून, गेल्या ८८ वर्षांपासून दुर्गा पूजा आयोजित केली जाते. यंदा हा उत्सव २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जात आहे. दुर्गोत्सवासाठी भव्य असा मंडप साकारला जात आहे. मंडपात छतावर ठिकठिकाणी झुंबर लावले जाणार आहेत. शिश महाल भासावा अशी सजावट मंदिराची केली जाणार आहे. दुर्गा मातेची मूर्ती पर्यावरणपूरक आहे, अशी माहिती क्लबचे सदस्य प्रसून रक्षित, दिलीप दास आणि मृणाल पुरकायस्थ यांनी दिली.

दुर्गोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उत्सवातून अवयवदानाचा संदेश दिला जाणार असून, नागरिक अवयवदानाची शपथ घेणार आहेत. दुर्गोत्सवाला चार दिवसांच्या कालावधीत सुमारे १० लाख नागरिक उपस्थिती दर्शवतील, असा विश्वास क्लबने व्यक्त केला आहे. 

५०१ आर्टिफिशिअल दिवे मंदिरात लावले जातीलदिव्य ज्योती मंदिराचे काम कला दिग्दर्शक नीलेश चौधरी करीत आहेत. मंदिरात ५०१ आर्टिफिशिअल दिवे लावले जातील. प्रवेशद्वारावर हत्तींची प्रतीकृती असणार आहे. नवमीच्या दिवशी कुमारी पूजा आयोजित करण्यात आली आहे. तिसऱ्या दिवशी भोग प्रसाद, तर रोजच धनूचे नृत्य सादर होईल. दसऱ्याला सिंदूर उत्सव साजरा केला जाईल.- जॉय चक्रवर्ती, प्रवक्ता, बंगाल क्लब, शिवाजी पार्क 

टॅग्स :नवरात्रीदसरा