भाजपच्या काळात सीबीआयची झाली पानटपरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 01:04 PM2020-11-21T13:04:23+5:302020-11-21T13:04:50+5:30
CBI News : अस्लम शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजप सरकारच्या काळातची सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झाली आहे अशी घणाघाती टिका त्यांनी केली.
अस्लम शेख पुढे म्हणाले की,सीबीआय भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात जाऊन कुणावरही गुन्हा दाखल करते. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, तिथल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर कारवाई केली जाते. हे फक्त भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्येच होते. सीबीआय प्रमाणेच अन्य सरकारी संस्थांचाही वापर भाजपाकडून केला जातो हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपाच्या सुडाच्या राजकारणाला काही अंशी अंकुश बसेल असे मत त्यांनी व्यक्त केले.