Video : संकट काळात मास्कचा काळाबाजार होतोय, मोक्का लावा; आशिष शेलांराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:18 PM2020-03-24T15:18:34+5:302020-03-24T15:20:31+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे.
मुंबई - मास्कचा बेकायदेशीर साठा करुन काळाबाजार केल्याप्रकरणी वांद्रे येथे सापडेल्या दोषींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र, अशा परिस्थितीत काही जणांकडून मास्कचा काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर वांद्रे परिसरात आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास 15-20 कोटींचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत.
कोटींच्या मास्कचा काळाबाजार उघड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मास्कचा बेकायदेशीर साठा व काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा, अशी मागणी मी सरकारकडे केली. pic.twitter.com/UJ1tVfN07R
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 24, 2020
या प्रकरणी वांद्रे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाईबद्दल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच या प्रकारणी दोषी असणाऱ्यांंवर मोक्काअंतर्गत कारवाई करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.