राज्यात दिवसभरात काेराेनाचे १० हजार रुग्ण, १६३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:06 AM2021-06-24T04:06:30+5:302021-06-24T04:06:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या १०,०६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या १०,०६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यात १,२१,८५९ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के झाले आहे.
राज्यात ११,०३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७,५३,२९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे सध्या राज्यातील मृत्युदर १.९९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.९५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,९७,५८७ झाली असून बळींचा आकडा १ लाख १९ हजार ३०३ झाला आहे.
.........................................................