दिवसभरात आढळले १८,६०० नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:46+5:302021-05-31T04:06:46+5:30
मुंबई : राज्यात रविवारी १८ हजार ६०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ ...
मुंबई : राज्यात रविवारी १८ हजार ६०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. दिवसभरातील २२ हजार ५३२ रुग्णांसह आजपर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.५५ टक्के इतके आहे.
राज्यभरात सध्या २ लाख ७१ हजार ८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर रविवारी ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली .सध्या राज्यातील मृत्युदर १.६५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ९४ हजार ८४४ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या तीन कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ नमुने पॉझिटिव्ह आले असून, हा दर १६.४४ टक्के इतका आहे. सध्या राज्यात १९ लाख ९८ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १२ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्य
आजचा मृत्युदर - १.६५ टक्के
आजचे मृत्यू - ४०२
आजचे रुग्ण - १८,६००
सक्रिय रुग्ण - २,७१,८०१