Join us

दिवसभरात २७,९१८ रुग्ण तर १३९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दिवसभरात २७ हजार ९१८ रुग्णांची नोंद झाली असून १३९ मृत्यू झाले आहेत, मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात २७ हजार ९१८ रुग्णांची नोंद झाली असून १३९ मृत्यू झाले आहेत, मागील तीन दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत किंचितशी घट झाली असून रुग्णसंख्या ३० हजारांच्या खाली गेली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २७ लाख ७३ हजार ४३६ झाली असून बळींचा आकडा ५४ हजार ४२२ झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ४० हजार ५४२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे, राज्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात असून ही संख्या ५७ हजार ६९४ इतकी आहे.

राज्यात मंगळवारी २३,८२० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९६ लाख २५ हजार ६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.१३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १६ लाख ५६ हजार ६९७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या १३९ मृत्यूंमध्ये मुंबई १०, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ४, मीरा भाईंदर मनपा २, पनवेल १, नाशिक १०, नाशिक मनपा १२, मालेगाव मनपा १, अहमदनगर ७, अहमदनगर मनपा २, धुळे ७, धुळे मनपा १६, जळगाव ३, नंदूरबार ७, पुणे ५, पुणे मनपा ४, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर १, सोलापूर मनपा २, सातारा ३, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा २, परभणी मनपा ३, लातूर २, लातूर मनपा ४, उस्मानाबाद १, बीड ४, नांदेड मनपा ३, अकोला मनपा १, अमरावती २, बुलडाणा १, वाशिम २, नागपूर १, नागपूर मनपा २, वर्धा ५, चंद्रपूर १ इ. रुग्णांचा समावेश आहे. राज्यात इतर कारणांमुळे १ हजार ३४५ मृत्यू झाले आहेत, यात मुंबईतील ९५२ रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत ४९ हजार १६७ रुग्णांवर उपचार

रुग्ण दुपटीचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा कमी

गेल्या २४ तासांत ४,७५८ नव्या रुग्णांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९ हजार ३२० वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११,६७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३,०३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ४७ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात २४,४६४ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ४० लाख ४१ हजार ८१० कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के आहे. १९ मार्च ते २५ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाचा वाढीचा दर ८५ टक्के इतका आहे. तर मुंबईतील दुपटीचा दर ५० दिवस आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या सक्रिय झोन ६९ आहेत, तर ६०२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २२,७३४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये वाढ

राज्यात १ जानेवारीला ८ हजार ५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. फेब्रुवारी महिन्यात घट होऊन १ फेब्रुवारीला ५ हजार ६५६ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. २८ फेब्रुवारीला यात वाढ होऊन ९ हजार ७१५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. १ मार्चला ९ हजार ६९० सक्रिय रुग्ण होते. १५ मार्चला १४ हजार ५८२, २५ मार्चला ३३ हजार ९६१ तर २९ मार्चला ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च ते २९ मार्च या महिनाभराच्या काळात तब्बल ३७ हजार ७६३ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.