दिलासा; मुंबई महानगर क्षेत्रात एकही मृत्यू नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळानंतर पहिल्यांदाच मुंबई महानगर क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचे दिसून आले.
राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला हाेता. त्या तुलनेत साेमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसेे कमी झालेे. साेमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४६ टक्के आहे.
.....................