Join us

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६ हजार २१८ रुग्ण, ५१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात काेराेनाच्या ६ हजार २१८ रुग्णांचे निदान झाले असून ५१ मृत्यूंची नोंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात काेराेनाच्या ६ हजार २१८ रुग्णांचे निदान झाले असून ५१ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील काेरोना बाधितांची एकूण संख्या २१,१२,३१२ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८५७ इतका आहे. सध्या ५३ हजार ४०९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात मंगळवारी ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

....................