राज्यात दिवसभरात काेराेनाचे ७ हजार ८६३ रुग्ण, ५४ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:35+5:302021-03-04T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ७ हजार ८६३ रुग्ण आणि ५४ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ७ हजार ८६३ रुग्ण आणि ५४ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१ लाख ६९ हजार ३३० झाली असून बळींचा आकडा ५२ हजार २३८ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के झाले असून मृत्यूदर २.४१ असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
दिवसभरात ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत २० लाख ३६ हजार ७९० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ७९ हजार ९३ रुग्ण उपचाराधीन आहेत. मंगळवारी नोंद झालेल्या एकूण ५४ मृत्यूंपैकी ३० मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत, तर १८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू सातारा २, वर्धा २, रायगड ९ आणि ठाणे १ असे आहेत. तर, ५४ मृत्यूंमध्ये मुंबई २, ठाणे १, नवी मुंबई मनपा १, उल्हासनगर मनपा २, पनवेल मनपा २, नाशिक ३, नाशिक मनपा ५, अहमदनगर १, पुणे मनपा ३, सोलापूर १, सातारा ३, रत्नागिरी २, जालना ५, लातूर १, लातूर मनपा १, बीड १, नांदेड मनपा १, अकोला मनपा २, अमरावती ४, अमरावती मनपा ४, वाशिम १, नागपूर १, नागपूर मनपा ३, वर्धा २, चंद्रपूर १, आणि अन्य राज्य- देशातील १ इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६४ लाख २१ हजार ८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५५ हजार ७८४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३ हजार ५५८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
.......................