निवडणुकीच्या काळात ट्विट्सने ओलांडला ३२ लाखांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:43 AM2019-10-27T00:43:47+5:302019-10-27T00:44:22+5:30
निवडणूक काळात करण्यात आलेल्या या ३२ लाख ट्विट्स निकालाच्या दिवशीचा आकडा अधिक होता
मुंबई : महाराष्ट्रासह हरयाणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता त्या त्या राज्यात सरकारे स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी सुरूआहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत म्हणजे २१ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत ट्रेडिंगमध्ये असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान टिष्ट्वटरवर करण्यात आलेल्या टिष्ट्वट्सने तब्बल ३२ लाखांचा टप्पा ओलांडला. ‘ट्विटर इंडिया’ या ऑफिशिअल अकाउंटवरून टिष्ट्वटरने ही माहिती दिली असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरून केलेल्या ट्विट्सची ट्विटरवर चलती होती.
महाराष्ट्र राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यापासून हॅशटॅग वापरून मोठ्या प्रमाणात ट्विट्स करण्यात येत होती. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला. यामुळे निवडणूक काळात तब्बल ३२ लाख ट्विट्स करण्यात आली.
निवडणूक काळात करण्यात आलेल्या या ३२ लाख टिष्ट्वट्समध्ये निकालाच्या दिवशीचा आकडा अधिक होता. हॅशटॅगला जोडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच मनसेच्या नावानेही टिष्ट्वट्स अपलोड होत होते. युजर्स हे ट्विट्स मोठ्या प्रमाणावर लाईक करत असल्याचेही या काळात पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंधित हॅशटॅगपैकी ३८ टक्के टिष्ट्वट्स भाजप-शिवसेना युतीचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा वाटा ३३ टक्के होता. विधानसभा निवडणुकीला अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, म्हणून प्रशासकीय यंत्रणांनीही मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्क साइट्सचा वापर केला. टिष्ट्वटरचाही यासाठी मोठा उपयोग करून घेण्यात आला. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह विविध क्षेत्रांतील सदिच्छादूतांकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
हॅशटॅग
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
#चलामतदानकरूया
#महाराष्ट्रविधानसभाचुनाव
#विधानसभाचुनाव2019