मुंबई - डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवर गणपतीच्या काळात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मेट्रो मार्गिकेवरून शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
महामुंबई मेट्रोने ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही मेट्रो स्थानकावरून शेवटची मेट्रो गाडी रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. दरम्यान, गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक उत्सव आहे. या कालावधीत सर्व भक्त आणि नागरिकांसाठी अखंडित वाहतूक सुविधा पुरवणे ही आमची जबाबदारी आहे. मेट्रो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ केल्याने उत्सवाच्या कालावधीत प्रवाशांना रात्री उशिरा प्रवास करण्यासाठी कार्यक्षम व सुविधाजनक पर्याय उपलब्ध होईल, असे एमएमएमओसीएलचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
या वाढीव फेऱ्या चालविल्या जाणारn गुंदवली ते अंधेरी (पश्चिम) : रात्री १०.२०, १०.३९, १०.५० आणि ११ वाजताn अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०.२०, १०.४०, १०.५० आणि ११ वाजताn गुंदवली ते दहिसर : रात्री ११.१५ आणि ११.३० वाजताn अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व) : रात्री ११.१५ आणि ११.३० वाजताn दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री १०.५३, ११.१२, ११.२२ आणि ११.३३ वाजता n दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०.५७, ११.१७, ११.२७ आणि ११.३६ वाजता