Join us

गणपती विसर्जनादरम्यान पोलीस अधिका-यावर हल्ला, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 3:06 AM

दहिसर पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिका-यावर गणपती विसर्जनादरम्यान हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला गुरुवारी रात्री अटक केली असून, तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबई : दहिसर पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिका-यावर गणपती विसर्जनादरम्यान हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला गुरुवारी रात्री अटक केली असून, तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.सनोज यदुवंशी शर्मा असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने दहिसर पोलिसांनीकडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्या वेळी घरटनपाडा परिसरातील एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत रात्री १२च्या सुमारास शर्माहुज्जत घालत असल्याचे पोलिसांनी पाहिले.दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू कसबे आणि तोरडमल यांनी मध्यस्थी करत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेतील शर्माने कसबे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना मारहाणही केली. या प्रकरणाची माहिती दहिसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्माला अटक केली.त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक चाकूदेखील सापडला. शर्मा हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर मारहाणीचे चार गुन्हे दहिसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हल्ल्यातील जखमी अधिकाºयावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :गुन्हा