राज्यात लॉकडाऊन काळात अपघातांमध्ये ६९ टक्के घट, मृत्यूही घटल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:55 AM2020-07-07T02:55:00+5:302020-07-07T02:55:30+5:30

२५ मार्च ते ३१ मेदरम्यान राज्यात अपघातांत ६९ टक्के घट झाली तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ६१ टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

During the lockdown period, there was a 69 per cent reduction in accidents and deaths in the state | राज्यात लॉकडाऊन काळात अपघातांमध्ये ६९ टक्के घट, मृत्यूही घटल

राज्यात लॉकडाऊन काळात अपघातांमध्ये ६९ टक्के घट, मृत्यूही घटल

Next

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. वाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले होते. २५ मार्च ते ३१ मेदरम्यान राज्यात अपघातांत ६९ टक्के घट झाली तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ६१ टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
राज्यात गेल्या वर्षी २५ मार्च ते ३१ मेदरम्यान एकूण ६५४४ अपघात झाले होते. यामध्ये २६५५ मृत्यू तर ५८३५ जण जखमी झाले होते. तर यावर्षी लोकडाऊनमध्ये २०३७ अपघात झाले. त्यात १०३२ जणांचा मृत्यू झाला तर १६४१ जण जखमी झाले. अपघातांचे प्रमाण ६९ तर मृत्यूत ६१ टक्यांनी कमी झाले आहे. जखमींचे प्रमाण ७२ टक्यांनी घटले आहे. या अहवालानुसार राज्यात मुंबई शहरात अपघातात ८१ टक्के आणि मृत्यू ७४ टक्के , जखमीत ८३ टक्के घट झाली आहे. गेल्यावर्षी २५ मार्च ते ३१ मे दरम्यान एकूण ५३८ अपघात झाले होते. यामध्ये ८२ मृत्यू तर ५७५ जण जखमी झाले होते. तर यावर्षी लॉकडाऊन काळात १०४ अपघात झाले त्यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर ९६ जण जखमी झाले.

राज्यात वेगाचे ४४ टक्के बळी
राज्यात लॉकडाऊन काळात २५ मार्च ते ३१ मेदरम्यान एकूण १०३२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यामध्ये ४४ टक्के मृत्यू हे भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. तर १८ टक्के अपघाती मृत्यू हे धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. वाहन दोष, चालकाच्या दुर्लक्षामुळे २५ टक्के अपघात झाले. तर इतर कारणांमुळे
१३ टक्के मृत्यू झाले.

Web Title: During the lockdown period, there was a 69 per cent reduction in accidents and deaths in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.