Join us

लॉकडाऊन काळात घाट भागात कामे वेगात सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 7:35 PM

लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाने मान्सून पूर्व कामे करण्यासाठी वेग धरला आहे.

 

मुंबई : लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाने मान्सून पूर्व कामे करण्यासाठी वेग धरला आहे. घाट भागात दरड कोसळू नये, यासाठी लोखंडी जाळ्या लावणे, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करणे, विद्युत दिवे दुरुस्त करणे अशी कामे वेगात सुरु आहेत. 

मागील पावसाळ्यात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी येथील मार्गिका बंद-चालूचा खेळ सुरू होता. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. यासाठी रेल्वेच्या इतिहासातील पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक घेऊन कामे केली होती. मात्र यंदा यंदा अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी आणि मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी लॉकडाऊन काळात कामे सुरु आहे.  लॉकडाऊन काळात प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र श्रमिक विशेष ट्रेन, मालगाडी आणि पार्सल गाडी सुरु आहे. या गाड्या घाट भागातून जातात. परंतु या गाड्यांचे नियोजन करून घाट भागाचे काम केली जात आहेत.

बोर घाट, थळ घाट या घाट भागातील कमकुवत दरड ओळखून सुरुंग लावून फोडणे. घाट भागात लोखंडी जाळ्या बसविणे, लहान-मोठया दरडची वाहतूक करण्यासाठी ट्रेन चालविणे, अशी कामे घाट भागात सुरु आहेत. यासाठी कुशल कामगार काम करत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. 

-----------------------

मान्सून बाबत खबरदारी पाळण्यासाठी पुस्तिका 

रेल्वे कर्मचाऱ्यांना मान्सून खबरदारी पुस्तिका देण्यात येणार आहे. यामध्ये भरती-ओहोटी यांची माहिती देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे कोणती खबरदारी घेण्यात यावी याची माहिती असणार आहे. 

----------------------------

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे  रुळावर पाणी साचण्याच्या ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. कुर्ला कारशेड, वडाळा, टिळक नगर येथे कॅनालयांची रुंदी वाढविण्यात आली आहे.  मुंबई उपनगरामध्ये सामाजिक अंतर राखून नाले साफ करण्यासाठी व नाल्यांतून घाण  काढण्यासाठी १६ जेसीबी / पोकलेन्स तैनात आहेत.  आतापर्यंत ९० कि.मी. गटाराची साफसफाई व पुलांच्या साफसफाईची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.  या लॉकडाउन कालावधीत ३ बीआरएन मक स्पेशल्स आणि २ ईएमयू मक स्पेशलद्वारे पुरेसा ब्लॉक घेऊन मक / मलब्याची विल्हेवाट लावली जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने दिली आहे. 

-------------------------------

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस