मुंबई : गेल्या आठवड्यात समुद्राला आलेल्या भरतीमुळे एकट्या मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर ९ हजार टन कचरा व डेब्रिज जमा झाल्याची माहिती एका एनजीओने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.गेल्या आठवड्यात भरतीदरम्यान समुद्रातील सर्व कचरा व डेब्रिज मरिन ड्राइव्ह किनाºयावर जमा झाले. ९ हजार टन कचरा येथे जमा झाला. पालिकेच्या कर्मचाºयांनीच तो स्वच्छ केला, अशी माहिती ‘सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन’ या एनजीओचे वकील शहजाद नक्वी यांनी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर न्यायालयाने यास जबाबदार कोण, असा सवाल केला असता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यास पालिका जबाबदार असल्याचे म्हटले. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पालिका ते समुद्रात सोडते. कचराही किनाºयाजवळच टाकते. त्यामुळे ही स्थिती ओढावली, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. हे मुद्दे गंभीर असल्याचे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवली.
भरतीदरम्यान मरिन ड्राइव्हवर जमा झाला ९ हजार टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 6:12 AM