सफाळे-वैतरणा दरम्यान मालगाडीचे डबे घसरले

By Admin | Published: March 8, 2017 02:59 AM2017-03-08T02:59:06+5:302017-03-08T02:59:06+5:30

सफाळे-वैतरणा दरम्यान मुंबई सेंट्रल कडे जाणाऱ्या मालगाडी चे तीन डबे घसरल्याने मुंबई-गुजरात कडे जाणारी अप-डाऊन सेवा संध्याकाळी ६ वाजल्या पासून अनिश्चित काळासाठी

During the Safai-Vaitarna, the coaches of the truck collapsed | सफाळे-वैतरणा दरम्यान मालगाडीचे डबे घसरले

सफाळे-वैतरणा दरम्यान मालगाडीचे डबे घसरले

googlenewsNext

पालघर/सफाळे : सफाळे-वैतरणा दरम्यान मुंबई सेंट्रल कडे जाणाऱ्या मालगाडी चे तीन डबे घसरल्याने मुंबई-गुजरात कडे जाणारी अप-डाऊन सेवा संध्याकाळी ६ वाजल्या पासून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे चाकर मान्याचे मोठे हाल होत डहाणू ते सफाळे दरम्यान चे सर्व स्थानके प्रवाशाच्या गर्दीने तुडुंब भरली होती.
गुजरात कडून मुंबई कडे जाणारी मालगाडीने सफाळे स्थानक सोडल्या नंतर संध्याकाळी ५.५८ वाजता त्या गाडीचे तीन डबे रु ळा वरून घसरले. त्यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन वैतरणा, विरार, बोरिवली येथे थांबवून ठेवण्यात आल्या. तर मुंबई कडे जाणाऱ्या लोकल ट्रेन पैकी केळवे आणि पालघरला पोहचलेल्या लोकल मधील प्रवाशांना उतरवून त्या लोकल डहाणूला परत माघारी पाठविण्यात आल्या. ह्याच दरम्यान, मंगळवारी दुपारी एक वाजता विरारच्या नारिंगी गावा जवळील रेल्वे फाटका जवळ गुजरातकडे जाणाऱ्या जयपूर-बांद्रा सुपरफास्ट एक्स्प्रेसखाली ५ म्हशी सापडल्याने काही काळा साठी गुजरात कडे जाणारी रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. त्या गाडीचे इंजिन बदलून सेवा पूर्वरत होत नाही तोच संध्याकाळी एन गर्दीच्या वेळीच ह्या मालगाडी चे डबे घसरल्याने मुंबई कडे जाणारी ६.१० ची डहाणू-चर्चगेट लोकल, ६.५२ ची वलसाड -बांद्रा पॅसेंजर, ७.३० ची डहाणू - चर्चगेट लोकल,८.१७ चि डहानु-दादर मेमु तर ८.४२ ची भरु च-विरार शटल ह्या गाड्या अनिश्चित वेळेसाठी बंद पडली. तर मुंबई हुन मोठ्या प्रमाणात येणारा प्रवासी वर्ग असल्याने तो मुंबई मध्ये अडकून पडला आहे.

सेवा पूर्वपदावर येण्यासाठी लागणार दहा तास
दिल्ली कडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस वैतरणा स्थानकात, तर गुजरात कडे जाणारी सुरत शटल, सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, दादर-डहाणू लोकल,फ्लार्इंग राणी एक्स्प्रेस, वलसाड फास्ट पॅसेंजर, पनवेल-डहाणू मेमो, लोकशक्ती एक्स्प्रेस ई. गाड्या विविध स्थानकात अडकून पडल्या आहेत.
माल गाडीचे डबे घसरल्याने हे डबे बाजूला काढण्यासाठी गुजरात मधून क्र ेन मागविण्यात आले असून ३ ते ४ तासांनी रेल्वे सेवा सुरळीत सुरु होईल असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्राप्त परिस्थिती पहाता कमीत कमी १० तास ही सेवा पूर्वपदावर येण्यासाठी लागू शकतो. पालघरच्या राज्य परिवहन महामंडळाने पालघर ते विरार आणि पालघर ते डहाणू अशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

Web Title: During the Safai-Vaitarna, the coaches of the truck collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.