Join us

अधिवेशन काळात २ लाख महिला आंदोलनात सहभागी, २६ संस्था, संघटनांचा आझाद मैदानात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 10:15 AM

शुक्रवार संध्याकाळपर्यंत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची संख्या २ लाखांच्या घरात आहे.  

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पाच दिवासांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यभरातून विविध मागण्यांसाठी २६ संस्था, संघटनांनी आझाद मैदानात मोर्चा, उपोषण, धरणे-आंदोलने केली. मात्र, नेहमीपेक्षा यावेळी पुरुषांच्या तुलनेत महिला आंदोलनांची संख्या सर्वाधिक होती. 

शुक्रवार संध्याकाळपर्यंत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची संख्या २ लाखांच्या घरात आहे.  राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू झाले. या पाच दिवसांच्या अधिवेशन काळात २६ संस्था संघटनांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण, मोर्चा, धरणे-आंदोलने केली. धरून बसले आहेत. 

माझे वय ६१ वर्षे आहे. आजही कुटुंबासाठी मला दोन पैसे कमविण्यासाठी घरकाम करावे लागते. मात्र, सरकार आम्हाला आमचे हक्क देत नाही. त्यामुळे घरदार सोडून आम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.- सुनंदा गुंजाळ, ठाणे, घर कामगार आंदोलक

कधी थंडी तर कधी कडक उन्हाचा सामना करत महिला आंदोलक आझाद मैदानात ठिय्या तर राज्यातील खेड्यापाड्यातून महिला आंदोलनासाठी आझाद मैदानाची वाट धरत असल्याचे दिसून येते. 

घर कामगार महिलांचे आंदोलन :

 १) ७,००० घर कामगार महिलांचे आंदोलन

२) ५,००० राष्ट्रीय मिल मजूर कामगार आंदोलन 

३) ६,००० जुनी पेन्शन योजना आंदोलन

४) २००० सफाई कामगार महिला आंदोलन 

५) ३,००० माथाडी कामगार आंदोलन 

६) ८०० राष्ट्रीय पोषण आहार आंदोलन

७) लहुजी सेना महिला आंदोलक ६००

टॅग्स :मुंबईसंप