- मनीषा म्हात्रे मुंबई : मुंबईत फसवणुकीच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या एकूण फसवणुकीचा आकडा तब्बल ४० अब्ज ७२ कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे कोणत्याही योजना किंवा अन्य आमिषांना बळी पडून पैसे गुंतविण्याआधी त्याची शहानिशा करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.पोस्टात गुंतवणुकीच्या नावाखाली १,७०० गुंतवणुकदारांना वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीने २० कोटींचा गंडा घातला. आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने हा घोटाळा उघडकीस आणत शुक्रवारी (१८ जानेवारी, २०१९) तिघांनाही बेड्या ठोकल्या. रमेश भट (६८) असे अटक पोस्ट दलालाचे नाव आहे. पत्नी योगिता (६५) आणि मुलगी भूमिका मोहीरे (३९) यांच्या मदतीने त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे आर्थिक फसवणुकीच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.मुंबईत दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यात सामान्य नागरिक भविष्यात जास्तीच्या पैशांच्या आमिषाला बळी पडून वेगवेळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. मुंबईत गेल्या चार वर्षांत ४६६ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. २०१७ मध्ये तब्बल १०९ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ९८ अब्ज ३८ कोटी, ६६ लाख ५६ हजार ८२८ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. २०१५-२०१६च्या तुलनेत हा आकाडा दुपटीने वाढला. २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये फसवणुकीच्या रकमेचा आकडा कमी असला, तरी १२३ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या दप्तरी झाली आहे. यामध्ये एकूण ४० अब्ज ७२ कोटी ११ लाख ७ हजार ४७० रुपयांचा फटका नागरिकांना बसला आहे.>प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उपअधीक्षकराज्यात होत असलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांचे आणि आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेता मुंबई, ठाणे ग्रामीण आणि गडचिरोली वगळता ३२ जिल्ह्यांत आर्थिक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी प्रत्येकी एक उपअधीक्षक नियुक्त करण्यात आला आहे.>निवृत्तीनंतर बँकेत जमा झालेल्या रकमेवर जास्तीचे व्याज मिळावे, यासाठी ज्येष्ठ नागरिक विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात, शिवाय शेतकरीही विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, कमी पैशात अधिक परतावा देण्याचे हे केवळ आमिष असते. फसवणूक झाल्याचे समोर येईपर्यंत आरोपी पैसे घेऊन परदेशात निघून गेलेला असतो. जरी हाती लागला, तरी तो उलट तक्रारदारांनाच धारेवर धरतो. त्यामुळे पैसे गुंतविण्यापूर्वी अथवा कुठलाही व्यवहार करण्याआधी त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. आपली गरज कशात आहे? आणि काय करतोय याचाही विचार करा. भारतातील सर्व पारपत्रे ही आधार क्रमांकाशी जोडून आधार क्रमांक, पारपत्र क्रमांक व बँके खाते क्रमांक एकच राहील, अशी व्यवस्था तातडीने करण्याची गरज आहे. त्यामुळे आर्थिक घोटाळे करणारे गुन्हेगार, दहशतवादी व अन्य गुन्ह्यांतील आरोपींना वेसण बसेल.- प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक.>एनएसईएल घोटाळा : नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमध्ये तब्बल १३ हजार गुंतवणूकदारांची ५,६०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार २०१३ साली उघडकीस आला. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. २८ डिसेंबर २०१८ मध्ये आरोपींवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.>४ वर्षांतील आर्थिकफसवणुकीचे गुन्हेवर्ष गुन्ह्यांची उकल रक्कम२०१५ १०५ ५५,६०,६६,११,२०६२०१६ ११९ ४२,७३,८७,७४,२४५२०१७ १०९ ९८,३८,६६,५६,८२८२०१८ १२३ ४०,७२,११,0७,४७०
मुंबईत वर्षभरात तब्बल ४० अब्ज ७२ कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 4:44 AM