शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 07:54 PM2022-09-28T19:54:49+5:302022-09-28T19:57:05+5:30

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली.

Dussehra gathering will answer why Shinde group split; Statement of Ramdas Kadam | शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान

शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान

Next

मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळें दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे.

“जय्यत तयारी करा, न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा”; ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. दसरा मेळावा हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा सोनं लुटणारा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्याचे आकर्षण असणार आहेत, असं दीपक केसरकरांनी सांगितलं. तसेच सगळी उत्तरं दसरा मेळाव्यात समजतील. मेळाव्याला मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. शिंदे गट का वेगळा झाला याचं उत्तरही दसरा मेळाव्यात मिळेल, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार शाही; माजी नगरसेवकांकडे दिली मोठी जबाबदारी

न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे.

Web Title: Dussehra gathering will answer why Shinde group split; Statement of Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.