Join us  

दसरा मेळाव्यात शिवसेनेने केले आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन

By admin | Published: October 23, 2015 3:37 PM

शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यात नेत्यांनी हायकोर्टाने मर्यादित केलेल्या आवाज डेसिबल नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी दसरा मेळावा गुरूवारी मोठ्या उत्साहात शिवाजी पार्कवर पार पडला असला तरी यावेळी शिवसेना नेत्यांनी हायकोर्टाने मर्यादित केलेल्या आवाज डेसिबल नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आवाज फाऊंडेशनतर्फे आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
आवाज मर्यादेचे बंधन घालून शिवाजी पार्कवर दरसा मेळावा घेण्यास शिवसेनेला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आवाज फाऊंडेशनने शिवाजी पार्कवरील सेनेच्या मेळाव्यादरम्यान नेत्यांच्या भाषणांचे डेसिबल रेकॉर्ड केले होते. त्यानुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा आवाज ८६ डेसिबल तर रामदास कदम यांचा सर्वाधिक आवाज ९६ डेसिबल इतका नोंदवण्यात आला आहे. हायकोर्टाच्या नियमानुसार शिवाजी पार्कमध्ये ६८ डेसिबलपर्यंत आवाजाची परवानगी असून उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांनी आवाजाची ही मर्यादा ओलांडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आवाज फाऊंडेशनतर्फे आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे.