दसरा मेळावा : उद्धव आज काय बोलणार? सरकारमधून बाहेर की घरोबा कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 02:58 AM2017-09-30T02:58:00+5:302017-09-30T02:58:13+5:30

शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणती भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Dussehra rally: What will Uddhav speak today? The government intimidation outside? | दसरा मेळावा : उद्धव आज काय बोलणार? सरकारमधून बाहेर की घरोबा कायम?

दसरा मेळावा : उद्धव आज काय बोलणार? सरकारमधून बाहेर की घरोबा कायम?

Next

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणती भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी शिवसैनिक, पक्षाचे जिल्ह्याजिल्ह्यांतील लहानमोठे पदाधिकारी यांची इच्छा आहे. तथापि, पक्षाचे मंत्री, आमदार हे सत्तेतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणाचा आवाज ऐकून निर्णय देतात, हा औत्सुक्याचा विषय आहे.
सरकारमधून बाहेर पडण्याबाबत ठाकरे यांनी अद्याप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी एकत्रितपणे चर्चा केलेली नाही. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर पक्षाची भूमिका दसरा मेळाव्यात मांडायची असेल तर मेळाव्याच्या दोन तास आधी आमच्याशी चर्चा केली जाते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ही परंपरा आहे. त्यानुसार गरज भासल्यास उद्धव ठाकरे हे उद्या काही जणांशी चर्चा करतील, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
दरम्यान, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी फडणवीस सरकारला धोका नसल्याचा दावा भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने बोलताना केला.
त्यामुळे उद्याच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या भाषणातून काही नवीन मुद्दे ते मांडण्याची शक्यता आहे.

सरकारला धोका नाही!
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी देवेंद्र फडणवीस सरकारला धोका नसल्याचा दावा भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना केला. त्यामुळे उद्या उद्धव काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे़

Web Title: Dussehra rally: What will Uddhav speak today? The government intimidation outside?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.