दसरा मेळाव्याचा ‘आवाज’ मर्यादेबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:04 AM2017-10-02T03:04:07+5:302017-10-02T03:04:26+5:30

दादर येथील शिवाजी पार्कात शनिवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह उर्वरित नेत्यांनी केलेल्या भाषणांनी ९६ डेसिबलची पातळी गाठली.

Dussehra 'voice' out of bounds | दसरा मेळाव्याचा ‘आवाज’ मर्यादेबाहेर

दसरा मेळाव्याचा ‘आवाज’ मर्यादेबाहेर

Next

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कात शनिवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह उर्वरित नेत्यांनी केलेल्या भाषणांनी ९६ डेसिबलची पातळी गाठली. आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी येथे केलेल्या सर्वेक्षणादरम्यान आवाजाची ही पातळी नोंदविण्यात आली आहे.
यासंदर्भात सुमेरा यांनी सांगितले की, मागील काही वर्षांच्या दसरा मेळाव्यातील आवाजाची पातळी किंचित कमी झाली आहे. मागील दोन वर्षे शिवाजी पार्कबाहेर देवी विसर्जनानिमित्त मिरवणूक सुरू होती. त्यामुळे आवाज जास्त होता. यंदा मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची आवाज पातळी ९६.२ एवढी नोंद झाली. दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये शिवाजी पार्क परिसर ‘शांतता क्षेत्र’ असल्याने शिवसेनेला दसरा मेळाव्यास कायदेशीर परवानग्या घ्याव्या लागल्या. यंदा मात्र तसे झाले नाही. शांतता क्षेत्रात ५० डेसिबलपेक्षा जास्त तर रहिवासी क्षेत्रात ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज नसावा, असा नियम आहे.

दसरा मेळाव्यातील ‘आवाज’ (डेसिबलमध्ये)
२०१७ - ९६.२
२०१६ - ९८.९
२०१५ - १०१
२०१३ - १०३.४
२०१२ - ९८
२०११ - ८५
२०१० - ९३.२

Web Title: Dussehra 'voice' out of bounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.