सावधान! पुढील १२ तासांत उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरला धुळीच्या वाऱ्यांचा धोका; हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 04:34 PM2022-01-23T16:34:39+5:302022-01-23T16:35:40+5:30

पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.

dust layer North Konkan Mumbai Thane and Palghar in next 12 hours warns imd | सावधान! पुढील १२ तासांत उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरला धुळीच्या वाऱ्यांचा धोका; हवामान खात्याचा इशारा

सावधान! पुढील १२ तासांत उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरला धुळीच्या वाऱ्यांचा धोका; हवामान खात्याचा इशारा

Next

मुंबई-

पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीतर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

मुंबईत इमारती, लोकल दिसेनाशी
हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

Web Title: dust layer North Konkan Mumbai Thane and Palghar in next 12 hours warns imd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.