महिला प्रवाशांचे  ६० हजार रुपये परत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्र्यांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 10:37 PM2020-12-10T22:37:24+5:302020-12-10T22:37:31+5:30

एसटीमध्ये विसरलेले महिला प्रवाशांचे  ६० हजार रुपये परत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्र्यांकडून कौतुक

Dutiful staff raises the image of ST - Anil Parab | महिला प्रवाशांचे  ६० हजार रुपये परत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्र्यांकडून कौतुक

महिला प्रवाशांचे  ६० हजार रुपये परत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्र्यांकडून कौतुक

Next

मुंबई : एसटी बसमध्ये विसरलेले ६० हजार रुपये संबंधित महिला प्रवाशाला परत करणाऱ्या चालक-वाहकांना थेट परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी फोन करून शाबासकी दिली व कौतुक केले. "अशा कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या मुळेच एसटीची जनमानसातील प्रतिमा उंचावते" असे प्रतिपादन यावेळी मंत्री परब यांनी केले.

पालघर आगाराची सकाळी ११ वाजता सुटणारी  पालघर - स्वारगेट (पुणे) हि एसटीची शिवशाही बस  घेवुन जाताना ,  पिंपरी चिंचवड येथील एक महिला प्रवाशाने पिंपरी ते स्वारगेट असा प्रवास केला . सदर महिला प्रवाशी प्रवास संपल्यावर स्वारगेट येथे उतरली .पण उतरताना सदर महिला आपली पर्स (ज्या मध्ये तब्बल ६० हजार रुपये होते, ) अनावधानाने एसटी बस मध्येच विसरली. 

आपली ड्युटी संपवल्यावर बसची रितसर तपासणी करताना वाहक तन्वीर राजे व चालक बाबासाहेब शेख यांना बसच्या आसनावर एक पर्स विसरलेली दिसली .त्या पर्समध्ये रोख रक्कम होती .लगेच या दोघांनी संबंधित महिलेला दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली पर्स विसरल्याचे सांगितले. सदर महिला तातडीने त्या बस जवळ आली.त्या महिलेला ती पर्स या कर्मचाऱ्यांनी सुपूर्त केली. त्या पर्समध्ये तब्बल ६० हजार रुपये होते .त्या महिलेने अत्यानंद झाला व त्वरित तिने त्या दोघांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले. ही घटना मंत्री अॅड.अनिल परब यांना कळताच त्यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून कौतुक केले .तसेच मंत्री महोदयांच्यावतीने विभाग नियंत्रक पालघर यांनी या कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केला आहे. या घटनेचे समाज माध्यमाद्वारे तसेच सर्व सामान्यांनकडून कौतुक होत आहे.
जनसंपर्क अधिकारी- एसटी महामंडळ

Web Title: Dutiful staff raises the image of ST - Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.