लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : खाडीकिनारी असलेल्या तलावात बुडून दोघा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दोघेही घणसोलीचे राहणारे असून खाडीकिनारी मासेमारीसाठी तयार केलेल्या तलावात ते पोहण्यासाठी गेले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. घणसोली सेक्टर १५ तलावाच्या ठिकाणी मंगळवारी ही घटना घडली. घणसोली चिंचआळी येथे राहणारी काही अल्पवयीन मुले तेथे पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासोबत युवराज थापा (१५) व हितेश क्षत्रीय (१२) हे दोघेही त्याठिकाणी गेले होते. परंतु खोलीचा अंदाज न आल्यामुळे युवराज व क्षत्रीय पाण्यामध्ये बुडाले. यावेळी घाबरलेल्या इतर मुलांनी त्यांच्या मदतीसाठी आरडाओरडा केला. काही अंतरावरच असलेल्या व्यक्तींनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर उशीर झाला होता.
तलावात बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: May 13, 2017 1:29 AM