डीवायएसपी सुजाता पाटील यांचा आत्महत्येचा इशारा, बदलीमध्ये डावलल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:58 AM2018-06-11T05:58:52+5:302018-06-11T05:58:52+5:30

गेल्या दोन वर्षांपासून वैयक्तिक अडचणीस्तव मुंबईत बदलीसाठी वारंवार प्रयत्न करूनही डावलण्यात आल्याने हिंगोलीच्या महिला उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.

DySP Sujata Patil News | डीवायएसपी सुजाता पाटील यांचा आत्महत्येचा इशारा, बदलीमध्ये डावलल्याने संताप

डीवायएसपी सुजाता पाटील यांचा आत्महत्येचा इशारा, बदलीमध्ये डावलल्याने संताप

Next

- जमीर काझी
मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून वैयक्तिक अडचणीस्तव मुंबईत बदलीसाठी वारंवार प्रयत्न करूनही डावलण्यात आल्याने हिंगोलीच्या महिला उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. आपल्याबरोबर व नंतर मुंबईबाहेर बदली झाल्यानंतर हजर न होता परस्पर बदली रद्द करून घेणारे असंख्य अधिकारी असताना आपल्यावर का अन्याय होत आहे, असा सवाल त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला. पोलीस मुख्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पाठविलेला मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला.
मुंबई पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाºया सुजाता पाटील यांची २०१६ मध्ये पदोन्नतीवर मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात बदली झाली. त्या ठिकाणी गृह उपअधीक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत. पाटील यांची तिन्ही मुले मुंबईत शिक्षण घेत आहेत. कौटुंबिक कारणास्तव मुंबईत बदली होण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री व पोलीस मुख्यालयातील अधिकाºयांना पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून(ओआर) त्यांनी विनंती केली. मात्र प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आले. शुक्रवारी गृह विभागाकडून उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्या यादीत नाव नसल्याने त्यांनी व्यथित होऊन महानिरीक्षक व्हटकर यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करत आत्महत्येचा इशारा दिला.
अत्यंत व्यथित अवस्थेत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझी तिन्ही मुले शिक्षणानिमित्त मुंबईत वास्तव्यास असून ती एकटी राहत आहेत. मुलगी १७ वर्षांची असून तिच्या सुरक्षेचा प्रश्न मला भेडसावत असतो. त्यांना भेटण्यासाठी १६ तासांचा प्रवास करून मला सुट्टीच्या दिवशी जावे लागते. दोन्ही ठिकाणचा खर्च परवडत नसल्याने मी कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे मुंबईत बदली व्हावी, यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करूनही आपल्या विनंतीचा विचार झालेला नाही. त्याउलट माझ्याबरोबर व त्यानंतरही अनेक अधिकाºयांची मुंबईच्या बाहेर बदली होऊन त्या ठिकाणी हजर न होता परस्पर मुंबईत बदली करून घेतली आहे. माझ्यावरच्या अन्यायामुळे मला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही.

बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार
वरिष्ठ अधिकारी जर आमच्या अडचणी, समस्या सोडवून घेणार नसतील तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा काय अधिकार आहे. माझ्याबरोबर व नंतर किमान ५०-६० अधिकाºयांनी मुंबईत बदल्या करून घेतल्या आहेत. राजकारणी व अधिकाºयांकडून दरवर्षी बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. वशिला नसणाºयांना डावलले जाते. मी व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज केल्यानंतर आयजी व्हटकर यांनी मला डीजी साहेबांना भेटण्याची सूचना केली. मात्र त्यांना सर्व काही माहीत असूनही निर्णय होत नाही. मला आता कोणालाही भेटण्याची इच्छा नसून जर निर्णय होत नसेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही.
- सुजाता पाटील, उपअधीक्षक , हिंगोली

वरिष्ठ अधिका-यांचे मौन
उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्या सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मेसेजबाबत मुख्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
 

Web Title: DySP Sujata Patil News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.