Join us

एसटीच्या ई-बससाठी मुंबईला डावलून अन्य भागात सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:05 AM

१०० विद्युत बससाठी एसटी महामंडळाकडून निविदालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रदूषणमुक्त प्रवासी वाहतुकीकडे वाटचाल करत एसटी महामंडळाने ...

१०० विद्युत बससाठी एसटी महामंडळाकडून निविदा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रदूषणमुक्त प्रवासी वाहतुकीकडे वाटचाल करत एसटी महामंडळाने इलेक्ट्रिकवरील बस चालविण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता. केंद्राच्या फेम-२ योजनेअंतर्गत सबसिडी असलेल्या १०० बससाठी एसटी महामंडळाने निविदा मागवल्या आहेत. परंतु मुंबईकरांना एसटीच्या ई-बसची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. कारण ई-बससाठी मुंबईला डावलून ही सेवा अन्य भागात चालवण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला.

सप्टेंबर २०१९ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत शिवाई या ई-बसचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या वेळी मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक मार्गावर शिवाई धावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मुंबई-पुणे महामार्ग वगळून राज्यातील १७ मार्गांसाठी १०० ई-बसकरिता निविदा मागवण्यात आल्या आहेत. यात पुणे-महाबळेश्वर, नाशिक-शिर्डी, पुणे-नाशिक या आणि अन्य मार्गांचा समावेश आहे. या बस चार्जिंगसाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील, असे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.