Join us  

ई-कोलाय बाधित बर्फ ९७ टक्के

By admin | Published: May 09, 2017 1:49 AM

अतिसार, जुलाब, कावीळ इत्यादी जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या इ-कोलाय बाधित बर्फाचे प्रमाण, एम/पूर्व विभागात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अतिसार, जुलाब, कावीळ इत्यादी जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या इ-कोलाय बाधित बर्फाचे प्रमाण, एम/पूर्व विभागात ९७ टक्के असल्याचे आढळून आले आहे. याच विभागात एप्रिल २०१७ मध्ये ९७ अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या विभागातील अनधिकृत फेरीवाले, सरबत विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील फेरीवाल्यांकडील ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वाधिक दूषित बर्फ व इ-कोलायचे प्रमाण असलेल्या गोवंडी, शिवाजीनगर येथील कारवाईतून १३ हजार ७०० किलो बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती एम/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.गोवंडी, देवनार, मानखुर्द, तुर्भे, शिवाजीनगर, भारतनगर, गणेशनगर, सह्याद्रीनगर, अयोध्यानगर, गौतमनगर, विष्णूनगर इत्यादी परिसरांचा यात समावेश होतो. या विभागासह महापालिकेच्या इतरही काही विभागांमध्ये अतिसार बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, तसेच याच भागांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ, पेयपदार्थ बर्फ नमुन्यांची व पाणी नमुन्यांची चाचणी केली असता, त्यात इ-कोलाय जीवाणू बाधित नमुने मोठ्या प्रमाणात आढळून आले होते.