ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:09 AM2021-08-14T04:09:13+5:302021-08-14T04:09:13+5:30

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाइल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करून घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा ...

E-crop survey project will be a guide for the country: Chief Minister Uddhav Thackeray | ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाइल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करून घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभाग संयुक्तपणे ई-पीक पाहणी प्रकल्प राबविणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात डिजिटल पद्धतीने या प्रकल्पाचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मोबाइल ॲपचे ऑनलाइन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, आता शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाइलमध्ये पाहणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पद्धतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पिकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत. सांघिक प्रयत्नातूनच नवीन प्रयोगांना यश मिळेल. सध्या रोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले की, ई-पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. सुरुवातीला टाटा ट्रस्टमार्फत अवघ्या दोन जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून याची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पिकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील १५ दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाइन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता ८ अ सुध्दा ऑनलाइन करण्यात आला आहे. कृषिमंत्री भुसे म्हणाले की, ई-पीक पाहणी प्रकल्पाने शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून, शेतीसाठी पीककर्ज आणि पीकविमा सुलभरीत्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Web Title: E-crop survey project will be a guide for the country: Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.