मुंबई महापालिका शाळांमध्ये सुरू होणार ई-लायब्ररी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:32 AM2020-03-11T00:32:37+5:302020-03-11T00:33:41+5:30

पालिकेच्या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. २५ शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू केली जाणार आहे.

E-library to be started in municipal schools | मुंबई महापालिका शाळांमध्ये सुरू होणार ई-लायब्ररी

मुंबई महापालिका शाळांमध्ये सुरू होणार ई-लायब्ररी

googlenewsNext

मुंबई : महापालिका शाळांमधील शिक्षण हायटेक करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार, व्हर्च्युअल क्लासरूम, टॅबनंतर आता शाळांना डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच पालिका शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. ई-लायब्ररीमुळे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छापील पुस्तके व इतर पुस्तके ध्वनी, चलचित्र, ग्राफिक्सच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात बघता येणार आहेत.

पालिकेच्या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. २५ शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू केली जाणार आहे. ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. यामध्ये आयएनपी कॉम्प्यूटरने कमी बोली लावल्यामुळे पालिकेच्या २५ शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांना देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एक कोटी ३१ लाख ६३ हजार रुपये पालिका मोजणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा

  • पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू २००७ पासून मोफत देण्यात येत आहेत.
  • विद्यार्थिनींना दररोज एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो.
  • आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येतो, तर नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम चालविण्यात येतात.

Web Title: E-library to be started in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.