आयआयटी मुंबईत आता ई-मोबिलिटी शिकता येणार, उद्योगाला जे हवे तेच शिकायला मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:21 IST2025-01-16T11:21:51+5:302025-01-16T11:21:57+5:30

पारंपरिक इंधनाचे मर्यादित साठे आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतातही ई-व्हेइकल वापरासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.

E-mobility can now be learned at IIT Mumbai, you will get to learn only what the industry needs. | आयआयटी मुंबईत आता ई-मोबिलिटी शिकता येणार, उद्योगाला जे हवे तेच शिकायला मिळणार 

आयआयटी मुंबईत आता ई-मोबिलिटी शिकता येणार, उद्योगाला जे हवे तेच शिकायला मिळणार 

मुंबई : उद्योगक्षेत्राला पूरक अभ्यासक्रम राबविण्यास आयआयटी मुंबईने सुरुवात केली आहे. त्यानुसार आयआयटी मुंबईत येत्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ई - मोबिलिटी हा नवा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविला जाणार आहे. 
सध्या जगभरात इलेक्ट्रिक व्हेइकल वापरावर भर दिला जात आहे. 

पारंपरिक इंधनाचे मर्यादित साठे आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतातही ई-व्हेइकल वापरासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यातून या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने नवा अभ्यासक्रम आयआयटी मुंबई सुरू करणार आहे. 

...हे विषय शिकवणार
इलेक्ट्रीक व्हेइकल डिझाइन, बॅटरी टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल ड्राइव्हस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे विषय शिकविले जाणार आहेत. यात संकल्पनात्मक आणि प्रात्यक्षिक शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अथवा बी. टेक पदवी घेतली आहे. त्याचबरोबर बीएससी किंवा बीएसची चार वर्षांच्या विषयाच्या संबंधित क्षेत्रातील पदवी घेतली असेल, त्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.

हा अभ्यासक्रम ‘एका एडटेक’ कंपनीसोबत डिझाइन केला आहे. त्यामध्ये आयआयटी मुंबईचे प्राध्यापक शिकविणार आहेत, तर तांत्रिक सहाय्य ‘एडटेक’ कंपनीचे घेतले जाणार आहे.
शिरीष केदारे, 
संचालक, आयआयटी मुंबई

Web Title: E-mobility can now be learned at IIT Mumbai, you will get to learn only what the industry needs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.