Join us  

गणेशोत्सवानंतरच ई-पास होणार रद्द! सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा विचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:05 AM

मालवाहतुकीसाठी पासची गरज नाही, कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आताच ई-पासची सक्ती मागे घेणे योग्य ठरणार नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले.

मुंबई : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत असली तरी मोहरम आणि गणेशोत्सवानंतरच ही सक्ती मागे घेण्यात येईल, असे सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

ई-पासची सक्ती मागे घेण्यास केंद्र सरकारने सांगितले असले तरी राज्यातील स्थितीचा विचार करून व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. प्रवासी वाहनांसाठी ई-पासची गरज असली तरी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अशा पासची वा स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मंगळवारी काढले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आंतरजिल्हा प्रवासावरील ई-पाससारखे निर्बंध हटवावेत, अशी मागणी केली. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.‘संकट टळलेले नाही’ई-पास आताच रद्द केला तर सणांच्या काळात आंतरजिल्हा वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आताच ई-पासची सक्ती मागे घेणे योग्य ठरणार नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअनिल देशमुख