प्रवासी पसंतीचा गड ‘ई-शिवनेरी’कडून सर, पहिल्याच आठवड्यात कमावले २० लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 06:18 AM2023-05-09T06:18:32+5:302023-05-09T06:20:25+5:30

एसटीतील ठाणे-पुणे (स्वारगेट) मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

E-Shivneri Bus earned Rs 20 lakhs in its first week | प्रवासी पसंतीचा गड ‘ई-शिवनेरी’कडून सर, पहिल्याच आठवड्यात कमावले २० लाखांचे उत्पन्न

प्रवासी पसंतीचा गड ‘ई-शिवनेरी’कडून सर, पहिल्याच आठवड्यात कमावले २० लाखांचे उत्पन्न

googlenewsNext

मुंबई :  एसटीतील ठाणे-पुणे (स्वारगेट) मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. १४८८ प्रवाशांनी  प्रवास केला असून  एसटीला २० लाख  ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

‘या’ शहरांत चारचाकी डिझेल वाहने बंद करा; पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीचा प्रस्ताव

ठाणे-पुणे मार्गावर सध्या १४ ई-शिवनेरी बस सुरू असून  प्रत्येक बसच्या दररोज तीन फेऱ्या होतात. गेल्या ७ दिवसांत ८१ रूपये प्रतिकिमी या दराने २० लाख ६७ हजार रूपये उत्पन्न मिळाले. शिवनेरीची संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध आहेत.

बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असून बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणमुक्त प्रवास होतो आणि इंधनावरील खर्च कमी करण्यास मदत होते. या शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी शिवनेरीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. एसटी महामंडळ पुनरुज्जीवन आराखड्यानुसार, एसटीचा परिचालन खर्च कमी करणे आणि प्रवासी गाड्या वाढवण्यासाठी ५,१५० विद्युत बस एसटी महामंडळात दाखल होणार आहेत. यामुळे २०२६-२७ अखेर राज्यातील सर्वच एसटी मार्गांवर एसटीची ई-बस धावणार आहेत.

Web Title: E-Shivneri Bus earned Rs 20 lakhs in its first week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई