अंधेरी ते दहिसर उन्नत मेट्रोसाठी ई-निविदा
By admin | Published: December 17, 2015 02:29 AM2015-12-17T02:29:04+5:302015-12-17T02:29:04+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने अंधेरी(पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग ७ च्या उन्नत आणि त्यावरील १६ स्थानकांच्या बांधकामांसाठी
Next
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने अंधेरी(पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग ७ च्या
उन्नत आणि त्यावरील १६ स्थानकांच्या बांधकामांसाठी पात्र कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या आहेत.
या मार्गाचे बांधकाम तीन पॅकेजमध्ये विभागले असून, यशस्वी कंत्राटदारांनी ते ३० महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
त्यासाठी निविदापूर्व बैठक ७ जानेवारी २०१६ रोजी स. ११ वा. आयोजित केली आहे.
निविदा दस्तावेज १ फेब्रुवारी
२०१६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करता येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात
आली. (प्रतिनिधी)