मुंबई : पश्चिम रेल्वेवर तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालांविरोधात कारवाई करत, ३४ जणांकडून २६० ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहे. प्रवाशांची होणारी फसवणूक रोखण्यास पश्चिम रेल्वेने विशेष टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, ३० नोव्हेंबरपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.दिवाळीच्या सुमारे २० दिवस आधी आणि दिवाळीनंतर सुमारे १५ दिवस अशा कालावधीत पश्चिम रेल्वेवर ही विशेष टीम कार्यरत असणार आहे. आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, रेल्वे कायद्यानुसार ३४ दलालांविरुद्धल ३० गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विशेष अभियानात दलालांकडून २० हजार ६४५ रुपयांची १० खिडकीवरील तिकिटे, तर ६ लाख ५२ हजार १९७ रुपये किमतीची २६० ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.‘आमिषाला बळी पडू नका’आॅनलाइन अथवा पीआरएस काउंटर किंवा अधिकृत रेल्वे तिकीट बुकिंग अधिकाºयांकडूनच प्रवाशांनी योग्य तिकीट घ्यावे. दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही पश्चिम रेल्वेने केले आहे.
ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा ‘पर्दाफाश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 5:24 AM