Join us

ई-कचराही संकटच, भविष्यात अधिक धोका : इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुनर्वापर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:49 AM

ई-कच-याचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आपल्यापुढे आ वासून उभी आहे. तिचे निराकरण वेळीच केले पाहिजे; नाहीतर भविष्यात ई-कच-याचे संकट उभे राहील, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे मांडले.

सागर नेवरेकर ।मुंबई : ई-कच-याचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आपल्यापुढे आ वासून उभी आहे. तिचे निराकरण वेळीच केले पाहिजे; नाहीतर भविष्यात ई-कच-याचे संकट उभे राहील, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे मांडले. प्लास्टीक कच-याबरोबर आता ई-कचराही डोके वर काढू पाहत असून, रोजच्या वापरात येणा-या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे धोका निर्माण झाला आहे. ई-कच-यावर वेळीच आळा घातला पाहिजे. ई-कच-याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली गेली पाहिजे, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.टेलिव्हिजन, मोबाइल, हेडफोन्स, टेलिफोन, प्रिंटर, बॅटरी, चार्जर, इलेक्ट्रॉनिक खेळणी, संगणक इत्यादी विद्युत उपकरणे खराब झाल्यावर त्यांचा ई-कचºयात समावेश होतो. बाजारात नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येतात. मात्र एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून खराब झाली, की तिचा पुनर्वापर केला जात नाही. नेहमीच्या कचºयात त्या वस्तू फेकून दिल्या जातात. तिथूनच समस्येला सुरुवात होते. ओला आणि सुका कचºयामध्ये ई-कचºयांचे विघटन होत नाही. नागरिकांकडील ई-कचºयाचे संकलन करून खासगी कंपन्यांकडून पुनर्चक्रांकनसाठी (रिसायकलिंग) दिल्यास ई-कचºयाचे प्रमाण कमी होईल, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पारा, शिसे, अँटिमनी असे अनेक धातू ई-कचºयात वापरले जातात. मोबाइलची बॅटरी डम्पिंग ग्राउंडवर जाणे धोकादायक आहे, अशी माहिती ह्युमॅनिटी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय शिंगे यांनी दिली.पद्धत चुकीची : सामान्य नागरिक ई-कचरा हा एकतर कचºयात फेकून देतो किंवा नगण्य भावाने भंगारवाल्यांना देतो. तिथूनच या दृष्टचक्राला सुरुवात होते. ई-कचºयाचे पुढे नेमके काय होते? याचा नागरिक कधी विचार करीत नाहीत. परिसरातील भंगारवाले ई-कचºयापासून धातू मिळवण्यासाठी अनैसर्गिक/विघातक पद्धतीचा अवलंब करतात. वायर जाळून तांबे मिळविणे, तत्सम धातू मिळविण्यासाठी (चांदी, अ‍ॅल्युमिनियम) अ‍ॅसिडीकरण करणे इत्यादी गैरप्रकारांचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे ई-कचºयावर चुकीच्या व अनैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया केल्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याचा ºहास होता.ई-कचरा घातकवायर ज्वलनामुळे अत्यंत घातक असे ‘डायॉक्सिन’ आणि ‘फ्युरन्स’ हे वायू हवेत मिसळले जातात. तसेच हे वायू अत्यंत विषारी असतात. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.