Join us

भ्रष्टाचाराची कमाई सेना नेत्यांच्या खिशात - संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 6:48 AM

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणून हिणवले. पण, या सर्व काळात स्वतःच्या अवतीभोवती काय सुरू आहे, हे पाहायला ते विसरले.

ठाणे :  शिवसेनेचे नेते आणि आमदारांनी मागच्या काही वर्षांत, दशकात अमाप माया गोळा केली. अवैध संपत्ती निर्माण केली. या सर्वांची कधीतरी चौकशी व्हायलाच हवी, अशा शब्दांत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ईडीने केलेल्या कारवाईचे एक प्रकारे समर्थन केले. ईडीची कारवाई राजकीय सूडबुद्धीचा परिणाम असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. मात्र, निरुपम यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडत कारवाईचे समर्थन केले. 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणून हिणवले. पण, या सर्व काळात स्वतःच्या अवतीभोवती काय सुरू आहे, हे पाहायला ते विसरले. त्यांच्याच शिवसेना नेत्यांनी किती मोठाले भ्रष्टाचार केले, मुंबई महापालिका तर भ्रष्टाचाराचा अड्डा बनली. या भ्रष्टाचाराची सगळी कमाई शिवसेना नेत्यांच्या खिशात, घरात जमा झाली. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी होणे आवश्यक आहे. जर, राजकीय सूडभावना नसेल तर भ्रष्टाचाराविरोधातील अशा कारवायांना विरोध होता कामा नये, असे निरुपम म्हणाले.

टॅग्स :संजय निरुपम