भातसा धरणाखाली भूकंपाचे धक्के ?

By Admin | Published: May 22, 2015 01:08 AM2015-05-22T01:08:57+5:302015-05-22T01:08:57+5:30

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या अंतर्गत आणि बाह्य भागात दहा दिवसांपासून मोठे हादरे बसत आहेत. याचबरोबर आवाजही येत असल्याने तेथील कर्मचारी हादरले आहेत.

Earthquake shocks under Bhatsa dam | भातसा धरणाखाली भूकंपाचे धक्के ?

भातसा धरणाखाली भूकंपाचे धक्के ?

googlenewsNext

जनार्दन भेरे ल्ल भातसानगर
शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या अंतर्गत आणि बाह्य भागात दहा दिवसांपासून मोठे हादरे बसत आहेत. याचबरोबर आवाजही येत असल्याने तेथील कर्मचारी हादरले आहेत. या सबंधीची माहिती कार्यकारी अभियंत्यांना देताच गुरुवारी ठाणे पाटबंधारे मंडळाच्या अधिक्षक अभियंता ए. वाघमारे यांनी धरणास भेट देऊन पाहणी केली.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादीत वैतरणा जल विद्युत केंद्र वैतरणानगर यांच्या वॉचमन रजिस्टरमध्ये या आवाज व धक्क्याची नोंद करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती तात्काळ कार्यकारी अभियंता भातसा धरण विभाग क्र. १ यांना दिली असल्याचे समजते. त्यानुसार ठाणे पाटबंधारे वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली. बसणारे धक्के व आवाज हे मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीचे असावेत असे वाटून त्यासाठीची उपाययोजना करण्यात आल्याचे भातसा धरण विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता एम. आमले यांनी यावेळी सांगितले.
तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा ही मोठी धरणे असून १९७१ मध्ये भातसा धरण बांधण्यात आले. १९८३ ते २००१ या १७ वर्षांच्या कालावधीत लहानमोठ्या १६ हजार ३५१ धक्क्यांची नोंद झाली होती. मात्र ९६ नंतर आतपर्यंत एकही भुकंपाच्या धक्क्याची नोंद झालेली नाही. मात्र १० मे २०१५ रोजी सकाळी ६ वाजता, १५ तारखेला सकाळी ६ वाजता व ६.४५ मिनिटांनी, १८ तारखेला ५ वाजून ४५ मिनिटांनी आणि ६ वाजून पाच मिनिटांनी भातसा धरण पायथ्याजवळ तसेच धरणाच्या अंतर्गत भागात मोठे हादरे बसले. तसेच आवाजांमुळे परिसरातील कर्मचारी वर्ग हादरला आहे.

Web Title: Earthquake shocks under Bhatsa dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.