ईस्टर्न.....भांडुपमध्ये ३ पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Published: September 12, 2014 10:38 PM2014-09-12T22:38:12+5:302014-09-12T22:38:12+5:30
ईस्टर्न.....
Next
ई ्टर्न.....................................................................भांडुपमध्ये ३ पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा भांडुप: रेशिनंग दुकानदाराला दुकानातील काळ्या बाजाराची बातमी प्रसिद्ध करून दुकानाचा परवाना रद्द करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळणार्या तिघा पत्रकारांवर भांडुप पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दखल झाला आहे. आदर्श सेतू साप्ताहिकाचा अमोल सुर्वे, न्यूज १२९ चा सुशील किशनलाल सोई (४४) आणि खबरे आज भी चा बाळासाहेब खोत (२९) अशी तिघा आरोपी पत्रकारांची नावे आहेत. तिघांपैकी सोई आणि खोत या दोघांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुलुंडला राहणारे हितेश रामजी गणात्रा यांचे भांडुपमध्ये साईप्रसाद जनरल स्टोर्स नामे रेशिनंग शिधावाटपाचे दुकान आहे. ८ सप्टेंबर रोजी अमोल सुर्वेने फोनवरून गणात्रा यांना शिधावाटप दुकानाचा काळा बाजार पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध करुन परवाना रद्द करण्याची धमकी दिली. त्यानेच असे न करण्यासाठी पेपरला आर्थिक हातभार लावण्यास सांगितले. त्यापाठोपाठ न्यूज १२९ चा सुशील किशनलाल सोई (४४) आणि खबरे आज भी चा बाळासाहेब खोत (२९) या दोघांनीही अशाच प्रकारची धमकी गणात्रा यांना दिली. त्यात तडजोडीसाठी ५० हजारांची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून गणात्रा यांना २५ हजारांची रक्कम घेवून मधुबन गार्डन येथे बोलवण्यात आले. दरम्यान, गणात्रा यांनी प्रस्तावाला होकार देत आधी भांडुप पोलिस ठाणे गाठून तक्र ार दाखल केली. मधुबन गार्डन येथे पैसे नेण्यासाठी आलेल्या बाळासाहेब याला पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. त्यापाठोपाठ रात्री ११च्या सुमारास सुशील सोईच्याही मुसक्या आवळल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोघांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले असून सुर्वेचा शोध सुरु असल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)