ईस्टर्न....क्रि केट खेळण्यावरून सोसायटीतील वाद शिगेला
By admin | Published: April 10, 2015 11:29 PM
ईस्टर्न....
ईस्टर्न....क्रि केट खेळण्यावरून सोसायटीतील वाद शिगेलामुलुंड: मुलुंड पूर्वेकडील गुंजन शलाका या सोसायटीमध्ये क्रि केट खेळण्यावरून सुरु झालेला वाद दिवसेंदिवस शिगेला जात आहे. क्रि केट खेळण्यावरून सुरु झालेल्या या वादात सोसायटीतील ३८ रहिवाशी विरु द्ध एक कुटुंब असा लढा सुरु आहे. मुलुंड पूर्वेकडील सानेगुरु जी मार्गावर असलेल्या गुंजन शलाका सोसायटीमध्ये ३९ कुटुंबे राहण्यास आहे. या सोसायटीत माहेरवाशीण महिला बाळंतपणासाठी आली आहे. नवजात बालक असल्याने या महिलेच्या शालिन भावसार कुटुंबीयांनी सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला. पण मुलांनी खेळायचे कुठे? असा सवाल करत सोसायटीतील रहिवाशांनी या कुटुंबाला विरोध दर्शविला. या वादातून भावसार आणि सोसायटीतील काही सभासदांची झटापट झाली. या झटापटीत स्वप्नील वाणी यांच्या नातेवाईकांना धक्काबुक्की झाली. याच रागातून वाणी यांनी शालीन भावसारला मारहाण केली. ज्येष्ठ गृहस्थ भाबड यांनीही भावसार कुटुंबियांना शिविगाळ केली. याप्रकरणी सोसायटीतील सभासदांनी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्र ार दिल्याची माहिती स्थानिक रहिवाशी विलास चौधरी यांनी दिली. तर दुसरीकडे भावसार यांनी नवघर पोलिस ठाणे गाठून तक्र ार दिली. भावसार यांच्या तक्र ारीवर नवघर पोलिसांनी वाणी आणि भाबड विरोधात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. भावसार यांनी केलेली तक्र ार खोटी असून पोलिसांनी याची चौकशी करावी, यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. तर नाहक त्रास देण्यासाठी आरोपी सोसायटीतील रहिवाशांना एकत्रित करून माझी तक्रार असल्याचे भावसार कुटुंबियांचे म्हणणे आहे. भावसार कुटुंबीयांनी सादर केलेल्या व्हीडियो क्लीपच्या आधारे दोघांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केल्यामुळे त्यांना अद्याप अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुलुंड नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)