Join us  

पूर्व उपनगरात ७५ टक्के नालेसफाई

By admin | Published: May 23, 2014 2:33 AM

शहर आणि उपनगरातील मोठ्या व छोट्या नाल्यांच्या साफसफाईची कामे एप्रिल महिन्यापासून सुरू आहेत.

मुंबई : शहर आणि उपनगरातील मोठ्या व छोट्या नाल्यांच्या साफसफाईची कामे एप्रिल महिन्यापासून सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने आखलेल्या कार्यक्रमांमुळे ७५ टक्क्यांहूनही जास्त नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे. पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामाच्या पाहणीदरम्यान कुंटे बोलत होते. पूर्व उपनगरातील नाहुर रेल्वे स्टेशन, भांडुप गाव येथील दातार कॉलनी नाला तसेच मध्य रेल्वेच्या खालून जाणार्‍या कलवर्टच्या साफसफाईचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच चेंबूर एम/पूर्व विभाग येथील सुभाषनगर नाला, देवनार क्षेपणभूमीजवळील रफिकनगर नाला आदी ठिकाणच्या नालेसफाईच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली. कामे समाधानकारकरीत्या चालू असली तरी आजूबाजूच्या वस्त्यांतील नागरिक प्लास्टीक व इतर टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकत असल्याने नाल्यांमध्ये तरंगणार्‍या वस्तू नियमितपणे काढाव्यात, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले. (प्रतिनिधी)