Join us

दृष्टिहिनांसाठी स्मार्टफोन हाताळणे होणार सोपे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:16 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांत झपाट्याने सोशल मीडीयाचे जाळे पसरले आणि दिवसागणिक विस्तारही जात आहे. मात्र अजूनही हे माध्यम ...

मुंबई : गेल्या काही वर्षांत झपाट्याने सोशल मीडीयाचे जाळे पसरले आणि दिवसागणिक विस्तारही जात आहे. मात्र अजूनही हे माध्यम दृष्टिहिनांसाठी पूरक नाही. या पार्श्वभूमीवर ‘इनोव्हिजन’ या दृष्टिहिनांसाठी काम करणाऱ्या संस्थेने अनोखे उपकरण शोधून काढले आहे. या माध्यमातून आता दृष्टीहिनांना स्मार्टफोन वापरणे अधिकाधिक सोपे होणार आहे. १५ आॅक्टोबर रोजी साजºया होणाºया ‘जागतिक अंध सहायता दिना’च्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना दृष्टिहिनांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

इनोव्हिजन या संस्थेच्या उपकरणाचे नाव ‘ब्रेल मी’ असे असून दृष्टिहिनांसाठी जणू हा मोबाईलचा नवा मित्र आहे. या उपकरणाच्या माध्यमातून संगणक आणि मोबाइल हाताळणे खूप सोपे होणार आहे. या उपकरणाविषयी इनोव्हिजनचा सह संस्थापक असणाºया श्याम शहा तरुणाने सांगितले की, हे उपकरण ब्लू टूथच्या सहाय्याने संगणक किंवा स्मार्ट फोनशी जोडता येणार आहे. त्यानंतर संगणक किंवा स्मार्ट फोन पूर्णपणे या उपकरणाद्वारे हाताळता येईल. यात स्टॅण्ड अलोन मोड आणि रिमोट मोड उपलब्ध आहेत. स्टॅण्ड अलोन मोडद्वारे स्मार्टफोनच्या मेमरी कार्डमधील फाइल्स सहजरित्या एडिट करता येतात. फाइल मॅनेजर, ब्लू टूथ, युएसबीसाठी वापरता येईल. शिवाय,वाचन, डॉक्युमेंट स्टोरेजही करता येणार आहे.

रिमोट मोडमध्ये सोशल मीडिया अकाऊंटमध्ये चॅटींग करणे, फोटो अपलोड करणे, तसेच या अकाऊंटवर अ‍ॅक्टीव्ह राहणे सुलभ होणार आहे. केवळ स्मार्टफोन्सवर नव्हे तर संगणकावरही वर्ड, एक्सेल, फोटोशॉप या उपकरणाद्वारे हाताळता येणार आहे. या उपकरणाच्या निर्मितीच्या संकल्पनेविषयी श्याम सांगतो की, बºयाच दृष्टिहिनांशी संवाद साधून, त्यांना संगणक आणि मोबाईल हाताळताना येणाºया समस्या नोंदविल्यानंतर हे उपकरण बनविण्यात आले आहे. त्यामुळे दृष्टिहिनांसाठी सध्याच्या जमान्यात हे क्रांतिकारक ठरणार आहे.