Join us

एसटी थांबते तिथे खा आणि खिसा रिकामा करा, महामंडळाचा हॉटेलसोबत करार, पण सुविधांच्या नावे बोंब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 1:32 PM

सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटीला प्राधान्य दिले जाते. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांच्या नाश्ता, जेवणाची सोय व्हावी किंवा त्यांना स्वच्छतागृहासाठी थांबता यावे यासाठी एसटी महामंडळाकडून काही हॉटेलसोबत करार झालेला आहे.

मुंबई : एसटीतून प्रवास करताना एसटी ठराविक हॉटेलवर थांबतात. यासंदर्भात हॉटेलशी एसटी महामंडळ करार करते. मात्र, अनेक हॉटेलवर स्वच्छता नसताना, पदार्थांची गुणवत्ता नसताना भाव मात्र खूप जास्त लावलेले असतात. मुंबई-पुणे मार्गावर हद्दीत असे तीन हॉटेल असून, त्यांच्याशी एसटी महामंडळाने करार केलेला आहे. परंतु प्रवाशांची येथे निराशाच होत असल्याचे दिसते. सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटीला प्राधान्य दिले जाते. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांच्या नाश्ता, जेवणाची सोय व्हावी किंवा त्यांना स्वच्छतागृहासाठी थांबता यावे यासाठी एसटी महामंडळाकडून काही हॉटेलसोबत करार झालेला आहे.

प्रवासादरम्यान एसटी याच हॉटेलवर थांबते. मुंबई विभागाच्या हद्दीत असे तीन हॉटेल एसटीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने करारबद्ध केलेले आहेत. यातील बहुतांश हॉटेल्समध्ये प्रवाशांना चढ्या दराने खाद्यपदार्थ किंवा जेवण दिले जाते. दुसरीकडे बस थांबत नसल्याने प्रवाशांना आवडले नाही तरी येथेच नाश्ता किंवा भोजन करण्याची वेळ येते. दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे व हॉटेलचीही अस्वच्छता यामुळे प्रवासी अशा ठिकाणी उतरण्यास नाके मुरडतात. त्यामुळे एसटी महामंडळाने येथे लक्ष घालून दर्जा सुधारण्याबाबत सूचना देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पाणी विकतच करारबद्ध हॉटेलमध्ये किफायतशीर दराने खाद्यपदार्थांची विक्री व्हावी, तेथे मोफत पाणी उपलब्ध असावे. स्वच्छतागृह किंवा इतर सुविधा असाव्यात अशी तरतूद असते. मात्र अनेक हॉटेलमध्ये विकतचेच पाणी प्रवाशांना घ्यावे लागते. कोठेही स्वत:हून मोफत पाणी हॉटेलचालक देत नाहीत.

चहा खूपच महागडा चहा २५ रुपयांना विकला जातो. मात्र त्याचा दर्जाही चांगला नसतो, पण प्रवाशांना तिथेच चहा प्यावा लागतो.स्वच्छतागृहांची दुर्दशासर्वच हॉटेलमधील स्वच्छतागृहांची अवस्था वाईट होती. काही हॉटेलवर प्रवाशांना लघुशंकेसाठी बाहेरच जावे लागले.

टॅग्स :एसटी