नव्या वर्षामध्ये ग्रहण, सुपरमूनसह उल्का वर्षाव, २०२३ हे वर्ष खगोलाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:47 AM2023-01-01T06:47:55+5:302023-01-01T06:48:13+5:30
२०२३ वर्षातील खगोलीय घटना निश्चितच ज्ञानवर्धनासाठी महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी चिकित्सकपणे अवकाशातील नयनरम्य घटनांचा आनंद घ्यावा.
मुंबई : नवे २०२३ वर्ष हे अनेक खगोलीय घटनांनी मोहक आणि मनोरंजक राहणार आहे. त्यात ४ ग्रहणे (२ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे), ११ उल्का वर्षाव, सुपरमून, मायक्रोमून, ग्रहांची युती-प्रतियुती, काही धुमकेतू, पृथ्वी जवळून जाणाऱ्या धोकादायक उल्का आणि इस्रोच्या आगामी वर्षातील अवकाशीय मोहिमा अशा घटनांचा समावेश राहणार आहे.
२०२३ वर्षातील खगोलीय घटना निश्चितच ज्ञानवर्धनासाठी महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी चिकित्सकपणे अवकाशातील नयनरम्य घटनांचा आनंद घ्यावा. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा न बाळगता वैज्ञानिक दृष्टिकोनातून खगोलीय घटनांचे निरीक्षण करावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
देशातून २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे दिसणार आहेत. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीमध्ये एका रेषेत येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते तर जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्य रेषेत येते तेव्हा चंद्रग्रहण होते. भारतातून केवळ ५-६ मे रोजीचे चंद्रग्रहण आणि २८-२९ ऑक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल.
सुपरमून, मायक्रोमून, ब्लू मून
जेव्हा चंद्र पृथ्वीजवळ असताना एखादी पौर्णिमा होते आणि चंद्र मोठा दिसतो तिला ‘सुपरमून’ असे म्हणतात. तर जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दूर असताना पौर्णिमा होते आणि चंद्र लहान दिसतो त्याला ‘मायक्रोमून’ असे म्हणतात. एकाच महिन्यात २ पौर्णिमा आल्यास तिला ‘ब्लू मून’ म्हणतात.
ग्रहण तारीख ग्रहण प्रकार भारतातून दिसेल काय?
५-६ मे छायाकल्प चंद्रग्रहण अस्पष्ट दिसेल
२८-२९ ऑक्टो. खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल
६ जानेवारी मायक्रोमून (पौर्णिमेचा लहान चंद्र)
५ फेब्रुवारी मायक्रोमून
१६ ऑगस्ट मायक्रोमून
२ ऑगस्ट सुपरमून
३०/३१ ऑगस्ट ब्लू मून
सुपरमून