वाहन खरेदीला ग्रहण, मुंबईत केवळ १८९ वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:27+5:302021-05-15T04:06:27+5:30

लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. दसरा, दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा या मुहूर्तावर मोठ्या ...

Eclipse of vehicle purchase, sale of only 189 vehicles in Mumbai | वाहन खरेदीला ग्रहण, मुंबईत केवळ १८९ वाहनांची विक्री

वाहन खरेदीला ग्रहण, मुंबईत केवळ १८९ वाहनांची विक्री

Next

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. दसरा, दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर खरेदीला पसंती दिली जाते. गतवर्षीही या सणावेळी लॉकडाऊनमुळे खरेदी न करता आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. नियोजित वस्तूंची खरेदी अक्षय तृतीयेला करायची, असे ठरवले होते. मात्र यंदाही वाहन खरेदी करता आली नाही. मुंबईत केवळ १८९ वाहनांची विक्री झाली असून २,१२,२३,२३८ कोटींचा महसूल मिळाला आहे. लॉकडाऊनपूर्वी मुंबईत १५०० ते २००० वाहनांची विक्री होत होती आणि कोट्यवधींचा महसूल मिळत होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. गुढीपाडव्यानंतर या महिन्याच्या मध्यास शुक्रवारी अक्षय तृतीयाचा मुहूर्त होता. या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे हाही मुहूर्त टळला असून यंदाचीही अक्षय तृतीया सुनी सुनी गेली आहे. त्यामुळे यंदाही गेल्यावेळीप्रमाणे वाहन खरेदीला कोरोनाचे ग्रहण लागले आहे.

आरटीओ विभाग -चारचाकी - दुचाकी मालवाहतूक -उत्पन्न

मध्य मुंबई - ५८- २७- ०-१२५६१०८०

पूर्व मुंबई -०-०-०-०

पश्चिम मुंबई -३५-७-०२-३६०१९३५

बोरिवली - ३४-२७-०७- ५०६०२२३

Web Title: Eclipse of vehicle purchase, sale of only 189 vehicles in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.