२६ डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:18 AM2019-11-26T07:18:10+5:302019-11-26T07:18:32+5:30

खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने गुरुवार, २६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार आहे.

The ecliptic solar eclipse can be viewed from India on December 5th | २६ डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार

२६ डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार

Next

मुंबई : खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने गुरुवार, २६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार आहे. यापूर्वी, १५ जानेवारी २०१० रोजी नऊ वर्षांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.

२६ डिसेंबरला होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ तामिळनाडू येथील काही, भागांतून दिसेल. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल, असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सोमण म्हणाले की, खग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते. परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा आपल्याला दिसते, त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. अक्षरश: ‘फायर रिंग’चे दर्शन आपल्याला होते. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावा, असे ते म्हणाले.

मुंबई येथे सकाळी ८.०४ ते १०.५५ या वेळेत तर, पुणे येथून ८.०५ ते १०.५८ या वेळेत हे ग्रहण दिसेल.
यानंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाºया सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशातून दिसणार आहे.

खंडग्रास स्थितीची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगळी

गुरुवार, २६ डिसेंबर रोजी होणाºया सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. यामध्ये कोइम्बतूर, धरमपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड, कन्नूर, करूर, कोझिकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, लिरूचीपल्ली, तिरुपूर इत्यादी ठिकाणे आहेत. साधारणत: दोन ते तीन मिनिटे खग्रास स्थिती तेथून दिसणार आहे. उर्वरित भारतातून या सूर्यग्रहणाची खंडग्रास स्थिती वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.

Web Title: The ecliptic solar eclipse can be viewed from India on December 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई