Join us

पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करून आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करून आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा, असे आवाहन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केले. पालिकेच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रिक वाहन दाखल करण्यात आली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महापालिकेतील वाहनांच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणा-या वाहनांसह सीएनजी वाहनांचाही समावेश आहे. त्यात आता पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. अशी पाच वाहनं नुकतीच पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. ही पाच वाहनं केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत.

सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आल्याने या वाहनांसाठी दरमहा २७ हजार रुपये खर्च येणार आहे. यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्याने या वाहनातून हरित वायू, कार्बनडाय ऑक्साईड आदी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे आठ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.