Join us

व्हॉइट कॉलर गुन्हेगारांवर आर्थिक गुन्हे शाखेचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

गेल्या वर्षभरात ५७ गुन्ह्यांची नोंदव्हॉइट कॉलर गुन्हेगारांवर आर्थिक गुन्हे शाखेचा वॉच (नियोजनाचा विषय)गेल्या वर्षभरात ५७ गुन्ह्यांची नोंद...

गेल्या वर्षभरात ५७ गुन्ह्यांची नोंद

व्हॉइट कॉलर गुन्हेगारांवर आर्थिक गुन्हे शाखेचा वॉच (नियोजनाचा विषय)

गेल्या वर्षभरात ५७ गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक राजधानीतील व्हॉइट कॉलर गुन्हेगारांवर आर्थिक गुन्हे शाखेचा वॉच आहे. अशात गेल्या वर्षभरात आर्थिक गुन्हे शाखेकडे ५७ गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यास आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत ५७ गुन्हे दाखल झाले असून यात ९६ अब्ज ८१ कोटी, ४८ लाख ९ हजार ६१८ मालमत्तेचा अपहार करण्यात आला आहे. हे सर्व गुन्ह्यांची उकल करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. २०१९ मध्ये हाच आकडा ११० वर होता. त्यापैकीही सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अशात, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारींपैकी ६३ टक्के तक्रारींमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली. १ जानेवारी २०१५ ते १६ सप्टेंबर २०२० पर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे ३४५७ तक्रारींची नोंद झाली. ज्यामध्ये ९७४ तक्रारींची चौकशी करण्यात आली. २८ टक्के प्रकरणांची चौकशी करण्यात आली, तर फक्त २७३ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. म्हणजे ९७४ पैकी फक्त ७ टक्के प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्या आरटीआयमधून समोर आणली आहे.

.........

आर्थिक गुन्हे शाखेकडे येणारी सर्वच प्रकरणे ही आर्थिक गुन्हे शाखेशी संबंधित नसतात. ती प्रकरणे तपासल्यानंतर त्यात काही खोटी निघतात. तर, काही स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवरचे असतात. त्यामुळे ते त्यांना वर्ग केले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

....

सहा वर्षांत ३०९३ प्रकरणे पोलिसांना वर्ग

गेल्या सहा वर्षांत आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारींपैकी ३०९३ तक्रारी संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

.....

९६ अब्ज ८१ कोटींचा अपहार

गेल्या वर्षभरात दाखल गुन्ह्यांत एकूण ९६ अब्ज ८१ कोटी, ४८ लाख ९ हजार ६१८ मालमत्तेचा अपहार करण्यात आला आहे.

.....